संशोधकांनी एक अशी सूटकेस तायर केली आहे जी तुमचा चेहरा ओळखून तुमच्या सोबत चालू शकेल.ही सुटकेस रोबॉटीक टेक्नॉलॉजीवर अधारीत बनवलेली आहे. ही सूटकेस चारपाई असून, १७० डिग्री वाईड अँगल कॅमेरा आणि पोजिशनींग साटी लाईडर अशी यंत्रणा या सूटकेसमध्ये बसविण्यात आली आहे. आयडेंटी फिकेशन आणि ट्रॅकींग अल्गोरिदमचा वापर करून ही सूटकेस आपल्या सोबत चालते.या सूटकेस सोबत एक ब्रेसलेटही येते. जे सूटकेस बाबत केली जाणारी छेडछाड किंवा सूटकेस ऑफ द ट्रॅक जाण्याबाबत माहिती देते. यात एक बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. जीचा वापर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी केला जातो. खासकरून या ट्रॅकरचा फायदा असा की, आपण जरी आपली सूटकेस विसरलात तरी, तुमची सूटकेस मात्र तुम्हाला मुळीच विसरणार नाही.महत्त्वाचे असे की, ही सूटकेस घेऊन जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे बटन दाबण्याची गरज नाही. तर, सूटकेस स्वत:हूनच तुमचा चेहरा आणि हालचाली पाहून तुमच्या मागे मागे येईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews